Home क्राईम जुन्या वादातून तरुणावर चाकूहल्ला ; परिसरात खळबळ

जुन्या वादातून तरुणावर चाकूहल्ला ; परिसरात खळबळ


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या वादाचा राग मनात धरून दोन तरुणांनी १९ वर्षीय युवकावर धारदार चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना जळगावच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. १७ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास बोरनार गावानजीक ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम गोपाल धनगर (वय १९, रा. बोरनार ता. जि. जळगाव) हा तरुण १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या मोटारसायकलने म्हसावडवरून बोर्नार गावाकडे जात होता. बोरनार गावाच्या एक किलोमीटर अलीकडे असलेल्या ‘स्वराज्य हॉटेल’ जवळ संशयित आरोपी राकेश पाटील आणि गजा कोळी (दोघेही रा. बोरनार) यांनी प्रेमची गाडी अडवली.

आरोपींनी जुन्या भांडणाचा विषय काढून प्रेमला गाडीवरून खाली उतरवले आणि त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी गजा कोळी याने फिर्यादी प्रेमला घट्ट पकडून ठेवले, तर मुख्य आरोपी राकेश पाटील याने जवळ असलेल्या धारदार चाकूने प्रेमच्या पाठीवर कमरेच्या बाजूला वार केले. यात प्रेम गंभीर जखमी झाला असून, हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ समाधान टहाकळे हे करत आहेत.


Protected Content

Play sound