Home क्राईम नाशिक-मुंबई महामार्गावर भरदिवसा गोळी झाडून तरूणाची हत्या

नाशिक-मुंबई महामार्गावर भरदिवसा गोळी झाडून तरूणाची हत्या


नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक-मुंबई महामार्गावर भर दिवशी हत्या झाल्याची मोठी खळबळजनक घटना घडली आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली भूषण लहामगे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ कारमधून काही अज्ञात व्यक्तींनी भूषण लहामागेवर गोळया झाडल्या.

या गोळीबारांमध्ये लहामगे यांचा जागीच मृत्यू झाला असून या हत्येच्या थरारांमुळे त्या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवांशामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भूषणचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छदेनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.


Protected Content

Play sound