भरधाव दुचाकीच्या धडकेत तरूण गंभीर जखमी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पान घेण्यासाठी रस्त्याचयाकडेला उभ्या असलेल्या तरुणाला समोरुन येणाऱ्या दुचाकीने धडक मारल्याची घटना कुसुंबा येथील रायपूर फाट्याजवळ घडली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी शुक्रवारी ७ जुलै रोजी रात्री ८ वाजता अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे योगेश दारासिंग राठोड हे वास्तव्यास आहे. रविवारी २ जुलै रोजी सव्वा दहा वाजेच्या सुमारास ते मामासोबत रायपूर फाटो येथील पान सेंटरवर पान घेण्यासाठी गेले होते. मामा पान घेण्यासाठी गेला असल्रूाने योगेश राठोड हे रस्त्याच्याकडेला उभा होता. यावेळी जामनेरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने योगेश राठोड याला धडक दिली. या अपघातात योगेश गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी ७ जुलै रोजी रात्री ८ वाजता अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफ्फार तडवी हे करीत आहे.

Protected Content