धारदार वस्तूने डोक्यावर वार, तरूण गंभीर जखमी !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापूरा भागातील हनुमान मंदीर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर धारदार वस्तूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी २५ मे रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र विक्रम हटकर (वय-३५, रा. गवळीवाडा, तांबापुर, जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान २५ मे रोजी दुपारी १ वाजता रवींद्र हटकर हा त्याचा घरी असताना संशयित आरोपी आकाश चव्हाण याने जुन्या भांडणाच्या कारणावरून रविंद्र याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने धारदार वस्तूने रवींद्रच्या डोक्यावर वार करून गंभीरज दुखापत केली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर जखमी रवींद्रला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यानंतर दुपारी ४.३० वाजता रवींद्र हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश प्रकाश चव्हाण रा. तांबापुरा याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील करीत आहे.