खंडेराव नगरातील तरूण बेपत्ता

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खंडेराव नगरमध्ये राहणाऱ्या ३६ वर्षीय तरुण हा घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आले आहे.

दिनेश प्रल्हाद चौधरी व 36 राणा खंडेराव नगर असे हरवलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनेश चौधरी हा मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह करतो. घरी एकटाच राहत असून त्याच्या घराच्या शेजारी त्याचा भाऊ हे वास्तव्याला आहे. दरम्यान २ मे रोजी सकाळी ११ वाजता घरात कोणाला काहीही न सांगता दिनेश चौधरी हा घराबाहेर पडला. त्यानंतर तो सायंकाळपर्यंत घरी आला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त करत दिनेशची आई कमलबाई प्रल्हाद चौधरी आणि भाऊ यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठेही तो आढळून आला नाही. अखेर गुरुवार १२ मे रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. कमलबाई प्रल्हाद चौधरी यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!