दोन दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चोपडा रोडवर एका तरुणाच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार दिल्याने ३० वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. याप्रकारणी दुपारी २ वाजता दुचाकीवरील अज्ञात चालकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळशीराम अण्णा कोळपे वय-३०, रा. नवलाणे ता.जि. धुळे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुळशीराम कोळपे हाथरून आपला कुटुंबीयासह वास्तव्याला होते. २९ मे रोजी दुपारी १२ वाजता ते धरणगाव ते चोपडा रोडवरील गावाजवळ जात असताना त्यांना समोरून येणारी एका दुचाकी (एमएच १९ बीवाय ६९०५) ने जोरधार धडक दिली. या धडकेत तुळशीराम कोळपे मृत्यू झाला. या प्रकरणी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर शिंदे करत आहे.

Protected Content