चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कट झालेल्या विजेच्या वायरला जोरदार धक्का लागल्याने तालुक्यातील पिलखोड येथील तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
रवींद्र सुरेश भिल्ल (वय २५) रा. पिलखोड ता. चाळीसगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र भिल्ल हा तामसवाडी येथे वेल्डींगच्या दुकानात कामावर असतांना गुरूवार १५ सप्टेंबर रोजी दुपारी दुकानातील कट झालेल्या वायरला त्याचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान रवींद्रचे दोन महिन्यांपुर्वीच लग्न झाले होते. ई-वडील ऊसतोडणीचे करतात. या घटनेने भिल्ल कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, सदर मृतदेहला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेबाबत मेहुणबारे पोलिस ठाण्यात अजून नोंद करण्यात आलेली नाही.