दुचाकी घसरल्याने तरूणाचा मृत्यू; धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी गावाजवळील खुबचंद पेट्रेाल पंपाजवळ दुचाकी घसरल्याने ३७ वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघात प्रकरणी अखेर शनिवारी ३० डिसेंबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश भिकन माळी वय-३७ रा. पाळधी खुर्द ता. धरणगाव जि.जळगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, गणेश भिकन माळी हे आपल्या परिवारासह धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथे वास्तव्याला होतो. मेकॅनिकचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ते त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीई ७७८८) ने जळगाव शहराकडून पाळधी येथे जात असतांना बांभोरी गावाजवळील खुबचंद पेट्रोल पंपासमोरील रोडवर त्यांची दुचाकी अचानक घसरली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी अखेर ३० डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अर्जून कुवारे हे करीत आहे.

Protected Content