Home क्राईम दुचाकी घसरल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू; वैजापूर रोडवरील घटना

दुचाकी घसरल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू; वैजापूर रोडवरील घटना


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात, भरधाव दुचाकीवरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दुचाकी चालविणाऱ्या वनरक्षकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वैजापूर ते खापाडा रोडवर घडली. मृतक लेदा सिताराम पावरा (वय ३४, रा. निमट्या, ता. रावेर) हे वैजापूर वनक्षेत्र कार्यालयात कार्यरत होते. घटनेच्या दिवशी वनरक्षक समीर मुबारक तडवी हे स्वतःच्या होंडा हॉर्नेट दुचाकीवरून लेदा पावरा आणि फिर्यादी बाजीराव रिंगन्या बारेला यांना घेऊन निघाले होते. हे सर्वजण पेट्रोलिंगसाठी खापाडा कंपार्टमेंट २३८ कडे जात असताना ही दुर्घटना घडली.

वैजापूरजवळ असलेल्या पुलाच्या वळणावर, वनरक्षक समीर तडवी यांनी दुचाकी अत्यंत भरधाव आणि निष्काळजीपणे चालवली. वेगावर नियंत्रण नसल्यामुळे दुचाकी घसरली आणि लेदा पावरा हे खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत फिर्यादी बाजीराव बारेला हे देखील जखमी झाले आहेत.

याप्रकरणी बाजीराव बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वनरक्षक समीर तडवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound