Home क्राईम उघड्या घरातून लॅपटॉप व तीन मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

उघड्या घरातून लॅपटॉप व तीन मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भूषण कॉलनी परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्याने घर उघडे असल्याचे पाहून आत प्रवेश केला आणि घरातील लॅपटॉप व मोबाईल असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भूषण कॉलनीतील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजजवळ असलेल्या तरूणाच्या घरात कोणीही नसल्याची आणि घराचे मुख्य दार उघडे असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातून लॅपटॉप, ३ मोबाईल असा एकुण ३३ हजार ५०० रूपयांचा ऐवज लांबविला. हा प्रकार समोर आल्यानंतर

ही बाब लक्षात येताच फिर्यादीने रामानंद नगर पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, १८ एप्रिल रोजी अज्ञात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound