जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकी स्लिप झाल्याने नगरदेवळा येथील ३० वर्षीय तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना ९ जून रोजी दुपारी १२ वाजता घडली होती. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना सोमवारी २४ जून रोजी रात्री ८ वाजता मृत्यू झाला आहे. घरातील कर्ता पुरूष आणि एकुलता एक मुलगा गेल्याने आईने एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुरेश साधू भोई वय ३० रा. बेडरपूरा, नगरदेवळा ता. पाचोरा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, सुरेश भाई हा तरूण आपल्या आईसह नगरदेवळा गावात वास्तव्याला होता. शेव व मुरमुऱ्या दुकान लावून तो आपला उदरनिर्वाह करत होता. रविवारी ९ जून रोजी दुपारी १२ वाजता दुचाकीने जात असतांना गावातच त्याची दुचाकी स्लीप झाली. त्यात सुरेश हा गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी २४ जून रोजी रात्री ८ वाजता त्यांचा प्राणज्योत मालविली. या घटनेमुळे त्यांच्या आईला धक्का बसला आहे. लहानपणीचे त्यांचे वडीलांचे निधन झाले होते. आईसोबत तो राहत होता. आता घरातील कर्ता पुरूष आणि एकुलता एक मुलगा गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.