Home क्राईम तरसोद येथे परप्रांतिय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

तरसोद येथे परप्रांतिय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

images
images

images

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील तरसोद येथे कामानिमित्त राहात असलेल्या परप्रांतिय तरुणाचा मृतदेह आज सकाळी रेल्वे लाईनजवळील एका वृक्षाजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू माडु काकडे (वय ४१) रा. शहापूर, जिल्हा बऱ्हाणपूर, हल्ली मुक्काम तरसोद हा जळगाव येथे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. आज सकाळी नशिराबाद-तरसोद रेल्वे लाईन दरम्यान असलेल्या एका वृक्षाखाली सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मयत स्थितीत आढळून आला. सकाळी गावातील कुलदीप पवार यांच्या नजरेस त्याचा मृतदेह पडल्याने त्यांनी तातडीने नशिराबाद पोलीस स्थानकात त्याबाबत माहिती कळवली. मयत राजू काकडे हा तरसोद गावात आपली पत्नी व मुलासह राहत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली व भाऊ असा परिवार आहे. गावातील पोलीस पाटील यांच्या खबरीवरून नशिराबाद पोलीसात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound