कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तरुणाचा महाराष्ट्राभर सायकल प्रवास

एरंडोल प्रतिनिधी । कोल्हापूर येथील एक तरुणाने सायकल प्रवास करीत संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून आज एरंडोल येथे पोहोचला आहे.

कोल्हापूर येथील नितीन गणपत नांगेनुरकर (वय २९) हा तरुण १ सप्टेंबर २०२० पासून कोल्हापूर येथून आपल्या स्वतःच्या सायकलने प्रवास करीत कोरोना जनजागृती करण्यासाठी एकटाच स्वतःच्या सायकलवर फिरत असल्याचे एरंडोल येथे आला असता त्याने सांगितले . 

आतापर्यंत त्याने गेल्या ७ महिन्यांत तब्बल ३० हजार किलोमीटर अंतर सायकलने प्रवास करीत ३२जिल्हे व २८० तालुक्यात स्वतःच्या सायकलवर कोरोना जनजागृती करण्यासाठी एकटा फिरुन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रचार करीत आहे . त्याने आपल्या अंगात कोरोना काळात घ्यावयाचे काळजी विषयीचे बॅनर घातले असुन त्याने आपल्या डोक्याच्या केसांची कटिंग सुद्धा — गो कोरोना या वाक्याची केली आहे . सायकलीवर सुद्धा जो  झेंडा लावला आहे त्यावर सुद्धा कोरोना रोखण्याचे ब्रीद वाक्य लिहलेले आहे.डोक्यावरील टोपी वर देखील सूचनांची वाक्ये आहेत नितीन यांना त्यांच्या गावातील सरकारी गाडीवरील ड्रायव्हर नंदराज नांदवडेकर यांनी ही कल्पना सुचवली . नितीन यांचे कोल्हापुरातील चंदगड येथे सायकलीचे दुकान आहे . 

त्यांचे शिक्षण ७ वी पर्यंत झाले असुन घरी आई, वडील व बहीण असा परिवार आहे . ते ज्या जिल्ह्यात जातात त्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या जेवणाची सोय करतात असे त्यांनी सांगितले . तसेच गेल्या महिना भरापासून जळगाव जिल्ह्यात ते सायकलीने फिरत असुन त्यांना जळगाव जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष प्रताप कौतिकराव पाटील यांनी सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच चोपडा येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे भेटले असता त्यांनी देखील आस्थेवाईकपणे चौकशी करुन मदत केली असल्याचे नितीन यांनी सांगितले. आपल्या या प्रवासाचा उद्देश कोरोना विषयी जनजागृती असुन याद्वारे जनप्रबोधन होत असुन प्रत्येक शहरात आपल्या या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.हा तरुणांनी आज एरंडोल नगर पालिका येथे भेट दिली. यावेळी मुख्य अधिकारी किरण देशमुख, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, विकास पंचबुधे , डॉ योगेश सुकटे, डॉ.अजित भट आदी कर्मचारी उपस्थित होते.त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जळगांव वरून ते मुंबई कडे रवाना होणार असून मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटून आपला दौरा संपवणार आहे.

 

Protected Content