जळगाव प्रतिनिधी । तीन जणांना अमानुष मारहाण करून तीन लाख रूपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार शहरातील कोर्ट चौक परिसरात घडला.
राहुल लखीचंद छाजेड (वय ३७, रा. रामानंदनगर ) हे कोर्ट चौकातील लक्ष्मण निवास या इमारतीत आपल्या कार्यालयात बसलेले असतांना रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन तरुणांनी त्यांना मारहाण करून धमकावले. यानंतर त्यांना कार्यालयाबाहेर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. तर त्यातील दोघांनी कार्यालयाच्या ड्रॉवरमधील ३ लाख रुपये लंपास केले. जखमी राहुल यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राहुल छाजेड यांना आठ दिवसांपासून धमक्या येत होत्या. यानंतर त्यांना मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला असून पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आहे.