जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकावर बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत, तरुणाचा मोबाईल तसेच पाच हजारांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार, २२ ऑक्टोंबर रोजी दुपारी पावणे चार वाजता जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील बदरखे येथील दिनेश सुधाकर ठाकूर (वय ३६) हा तरुण १९ ऑक्टोंबर रोजी जळगावात आला होता. काम आटोपून पुन्हा गावी जाण्यासाठी तो सव्वा चार वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील नवीन बसस्थानकावर आला. याठिकाणी जळगाव-पाचोरा या बसमध्ये चढतांना अज्ञात चोरटयाने त्यांच्या खिशातील १५ हजारांचा मोबाईल, त्याचे कव्हर तसेच ५ हजारांची रोकड असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल लांबविला. प्रकार लक्षात आल्यानंतर दोन दिवसांनी दिनेश ठाकूर याने शनिवार, २२ ऑक्टोंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रुस्तम तडवी हे करीत आहेत.
नवीन बसस्थानकात तरूणाचा मोबाईल व रोकड लंपास
2 years ago
No Comments