जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेहरू चौक येथे कामाच्या निमित्ताने आलेल्या एकाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “राहूल वसंत बडगुजर (वय-४२) रा. सूनंदिनी नगर, प्रजापत नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. कलरकाम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीबी ६८८२) क्रमांकाची दुचाकी आहे. त्यावरून ते कामासाठी ये-जा करत असतात.
मंगळवार, दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता जळगाव शहरातील नेहरू चौकात पतंजली दुकानासमोर कामानिमित्त ते दुचाकीने आले. तिथेच दुचाकी पार्कीगला लावली. काम आटोपून ते परत दुचाकीजवळ आले असता त्यांना जागेवर दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु कुठेही मिळाली नाही.
आज बुधवार, दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.