Home क्राईम कांचन नगरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणावर चाकू हल्ला

कांचन नगरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणावर चाकू हल्ला

0
76

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून कांचन नगर येथे प्रजापत नगरातील तरूणाला धारदार चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत बुधवार २३ फेब्रुवारी रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनीपेठ पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रजापत नगरातील रहिवाशी राजेश रमेश गवळी (वय-३४) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राजेश गवळी हा कांचन नगरातील चौघुले प्लॉट येथे किरणा दुकानावर उभा असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून विशाल उर्फ पप्या (पुर्ण नाव माहित नाही) याने धारदार चाकूने वार करून जखमी केले. यात राजेश याला मांडीला, कंबरेच्याखाली वार केले आहे. जखमीस तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यासंदर्भात रात्री १० वाजता संशयित आरोपी विशाल उर्फ पप्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील करीत आहे.

 

 

 


Protected Content

Play sound