जळगाव प्रतिनिधी । गिरणा नदीवरील कांताई बंधाऱ्यावर मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीली आहे. मृतदेह शोध घेण्याचे काम सुरू आहेत.
सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पिंप्राळा परिसरात राहणारा तरूण आकाश चंद्रकांत पाटील (वय-२१) हा तरूण आज दुपारी २ वाजेच्या सुमारास मित्रांसह मोहाडी गावापासून जवळ आलेल्या गिरणा नदीवरील कांताई बंधाऱ्यावर फिरण्यासाठी गेला. दरम्यान, मित्रांसोबत पोहत असतांना पाण्याचा अंदाज न असल्याने आकाश पाटील हा पाण्यात बुडाला. दरम्यान, कांताई बंधारा हा तुडूंब भरलेला असल्यामुळे त्याचा मृतदेहाचा शोध घेणे सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सतिष हारनोळ, हरी पाटील, सुशील पाटील, प्रविण हिवराळे यांनी धाव घेतली. पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेची तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.