पिंप्री खु ता. धरणगाव प्रतिनिधी । येथुन जवळच असलेल्या भोदबु येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असुन रात्री उशीरा अंन्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमरसिंग भिमसिंग पाटील (वय-२०) असे मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात पाऊस असल्यामुळे अंजनी नदीतील पाण्याचे प्रमाण आधिक वाढलेले आहे. दरम्यान, याठिकाणी पोहण्यासाठी काही तरुण आलेले असतांना अमरसिंग पाटील याला पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा पाण्यात बुडून दुदैवी अंत झालेला आहे. या घटनेची माहिती मिळताच, गावातील नागरिकांनी नदिकडे धाव घेऊन बचाव कार्यास सुरवात केली अथक परिश्रमानंतर अमरसिंग याचा शोध लागला परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मावळली होती.
अमरसिंग हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे . वडिल भिमसिंग पाटील हे शेतकरी असुन ग्रामपंचायत भोदबु येथे शिपाई म्हणून कार्यरत आहे . धरणगांव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असुन रात्री उशीरा अंन्यसंस्कार करण्यात आले.