Home Cities अमळनेर अमळनेरात किराणा दुकानाचे गोडावून चोरट्यांनी फोडले

अमळनेरात किराणा दुकानाचे गोडावून चोरट्यांनी फोडले

0
410


अमळनेर प्रतिनिधी । शहरातील किराणा मालाचे गोडावून अज्ञात चोरट्यांनी फोडून २५ हजार ८०० रूपये किंमतीचा किराणा सामानाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रामकुमार रमेशकुमार सैनानी (वय-३८) रा. सामेश्वर कॉम्प्लेक्स यांचे सोमेश्व कॉम्प्लेक्स येथे किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे २७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता किराणा दुकान व गोडावूनला कुलूप लावून घरी गेले. दुसऱ्या दिवशी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता गोडावूनजवळ आले असता चोरट्यांनी गोडावूनचे कुलूप तोडून गोडावून मधील किराणा सामान असा एकुण २५ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी रामकुमवार सैनानी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापु साळुखे करीत आहे. 


Protected Content

Play sound