धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू !


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अनोळखी ३५ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भुसावळ रेल्वेस्थानक जवळील रेल्वे खंबा क्रमांक ४४१ येथील अप लाईन रविवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका अनोळखी ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर स्थानिक रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. दरम्यान त्यांच्या खिश्यात ओळख पटविण्याचे कोणतेही साहित्य किंवा कागद मिळाला नाही. त्यानंतर अनोळखी म्हणून मृतदेह भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पीएसआय मंगेश जाधव हे करीत आहे.