Home क्राईम शेत रस्त्याच्या कारणावरून तरूणाला लाकडाने मारहाण

शेत रस्त्याच्या कारणावरून तरूणाला लाकडाने मारहाण

0
32

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील रस्त्याच्या कारणावरून शिरसोलीतील तरूणाला लाकडी दांडका मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश एकनाथ ताडे (वय-३०) रा. ताडे वाडा, शिरसोली ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वस्तव्याला आहे. त्यांचे वडीलोपार्जित शेत आहे. शुक्रवार १३ मे रोजी त्याच्या घरासमोर शेतातील रस्ता देण्याच्या कारणावरून त्याचे वडील एकनाथ ताडे आणि काका हे बोलत असतांना विशाल रघूनाथ ताडे याने बाजूला उभा असलेला राकेशला शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात राकेश हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनाप्रकरणी रात्री १० वाजता राकेश ताडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात  संशयित आरोपी विशाल रघूनाथ ताडे रा. ताडेवाडा शिरसोली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक स्वप्निल पाटील करीत आहे.

 


Protected Content

Play sound