जुन्या भांडणाच्या कारणावरून कुसुंबा येथील तरूणाला बेदम मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा बसस्थानकाजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला अश्लिल शिवीगाळ करून बिअरच्या बाटलीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हर्षल राजेंद्र सोनवणे (वय-२२) रा. कुसुंबा ता.जि. जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार २ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कुसुंबा येथील बसस्थानकाजवळील दत्त मंदीरानजीक उभा असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील तुषार कोळी, अमित तडवी, करण व सोन्या (पूर्ण नाव माहित नाही) आणि त्यांच्या सोबत इतर जणांनी हर्षलला अडवून अश्लिल शिवीगाळ केली. व हातातील प्लास्टिक पाईप, काठी आणि बिअरच्या बाटलीने बेदम मारहाण करून डोक्यावर व चेहऱ्यावर मोठी दुखापत केली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता हर्षल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तुषार कोळी, अमित तडवी, करण व सोन्या (पूर्ण नाव माहित नाही) आणि त्यांच्या सोबत इतर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिश शेख करीत आहे.