Home क्राईम गोपाळपुऱ्यात तरूणाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

गोपाळपुऱ्यात तरूणाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल


जळगाव प्रतिनिधी । पोलीसांना माहिती देते असल्याच्या संशयावरून तरूणाला तिघांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, आकाश राजेंद्र पवार (वय-२१) रा. श्रीकृष्ण नगर, गोपाळपुरा जळगाव हा त्यांच्या घरासमोर बालाजी किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. २३ जून रोजी रात्री ९ वाजता दुकानावर काम करत असतांना अमोल राजेंद्र पाटील व तुषार राजेंद्र पाटील आले. पोलीसांना माहिती का पुरवतो असे विचारले असता मी माहिती पुरवित नाही असे आकाशने सांगितले. याचा राग आल्याने अमोल पाटील आणि तुषार पाटील यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तर सागर राजेंद्र चौधरी हा काठी घेवून आकाशच्या कानवर मारली. यात आकाश पवार कानावर गंभीर दुखापत झाली. गल्लीतील काही नागरीकांनी भांडण सोडवासोडव केली. आकाश पवार याच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे करीत आहे.


Protected Content

Play sound