गाडी घेण्यासाठी विवाहितेचा छळ; शनीपेठ पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । चरित्र्यावर संशय आणि गाडी घेण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी २८ खेडी रोड येथील माहेरवाशींचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळीविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, चैताली निलेश राठोड रा. अकोला ह.मु. खेडी रोड जळगाव यांचा विवाह अकोला येथील निलेश मोहनसिंग राठोड यांच्याशी चार वर्षांपुर्वी विवाह झालेला आहे. लग्नानंतर पहिले तीन महिने चांगले गेले. त्यानंतर पतीने लहान लहान गोष्टींमध्ये चुका काढून शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर विवाहितेच्या चरित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान, गाडी घेण्यासाठी १० लाख रूपये आणावे यासाठी सतत मारहाण करत होता. तसेच घरातील चुकांसाठी सासू पियुषमा मोहनसिंग राठोड, नणंद भारती नितीन चव्हाण, नंदोई नितीन मधु चव्हाण सर्व राहणार जठारपेठ सिध्दीविनायक मंदीरासमोर अकोला, रोशन मोहनसिंग राठोड रा. मलकापूर अकोला यांनी टोमणे मारणे सुरू केले. या त्रासाला कंटाळून विवाहिता २४ जून रोजी माहेरी निघून आल्या. आज शुक्रवारी सकाळी १० वाजता विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कनसे करीत आहे.

Protected Content