मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेसाठी मविआकडून, विशेषत: मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द कसा पाळला नाही, असे सांगत छत्रपतीं संभाजीराजेनी माघार घेतली. हा दावा शिवसेनेने फेटाळला असून, आम्ही तुमचे स्वागत केले होते. राज्यसभेवर शिवसेनेचेच म्हणूनच तुम्ही जायला हवे होते, पण ती संधी घालवली, असे शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने पाठींबा द्यावा यासाठी छत्रपतीं संभाजीराजेनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यापूर्वी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. यावेळी छत्रपतीनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत अपक्ष उमेदवार म्हणून पाठींबा द्यावा असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचे स्वागत करीत शिवसेनेत येऊन राज्यसभेवर पाठवण्यासाठी होकार दिला. आणि आता तुम्ही तुमच्या विचारांशी ठाम राहिलेत म्हणून शिवसेनेकडून, विशेषत: मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द कसा पाळला नाही, हे सांगितले.
गेल्या राज्यसभेत सदस्य निवडीच्या वेळी राष्ट्रवादीला दोन जागावर शरद पवार आणि फौजिया खान या निवडून गेल्या होत्या. आता यावेळी ठरल्यानुसार शिवसेनेला या जागा असल्याने राष्ट्रवादी ऐवजी शिवसेनेचे दोन सदस्य पाठवण्याची संधी होती. आणि शिवसेनेचे दोन राज्यसभा खासदार जात असतील, तर ते मूलत: शिवसेनेच्याच विचारांचे हवेत. छत्रपती राज्यसभेत अपक्ष म्हणून गेलेत, तर सेनेची संख्या म्हणून धरली जाणार नाही. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी शिवबंधन बांधा आणि राजसभेवर शिवसेनेचे सदस्य म्हणून जा असा आग्रह होता. आणि हा विचार पक्ष, संघटना म्हणून महत्त्वाचा असल्यानेच उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकाला ही संधी द्यावी असा हेतू होता.
शिवसेनेनं पक्षाची उमेदवारी देऊ केल्यानंतर संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय ठामपणे सांगितल्यानंतर सेनेने संजय पवारांना उमेदवारी दिली. यानंतर आज संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेकडून, विशेषत: मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द कसा पाळला नाही, या संभाजीराजेंच्या दाव्यांवर अरविंद सावंत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.