जळगाव प्रतिनिधी । लग्नानंतर अवघ्या महिनाभरात ‘तु आवडत नाही, तुम्ही आम्हाला चालत नाही’, असे मोबाईलवर मेसेज पाठवून रायसोनी नगरातील माहेरवाशी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात नागपूर येथील पतीसह सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुवर्णा सचिन निंबुळकर (वय २९) यांचे जळगाव शहरातील रायसोनी नगर येथील माहेर आहे. मे २०२१ मध्ये सुवर्णा निंबुळकर यांचा वानाडोंगरी ता. हिंगणा.जि. नागपूर याच्यासोबत विवाह झाला. लग्नाला महिला उलटत नाही तोच तिचे पतीसह सासरच्यांनी तु आम्हाला आवडत नाही, तु आम्हाला चालत नाही, तुम्ही आम्हाल पसंद नाही, असे म्हणून वेळावेळी शिवीगाळ तसेच फोनद्वारे मॅसेज पाठवून सुवर्णा हिचा छळ केला. छळ असह्य विवाहिता माहेरी आल्या. शुक्रवार १३ ऑगस्ट रोजी त्यांनी याबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन पती सचिन लक्ष्मण निंबुळकर, लक्ष्मण कोठीराम निंबुळकर, शारदा लक्ष्मण निंबुळकर, रितेश निंबुळकर, सर्व रा. महाजनवाडी, वानाडोंगरी, ता हिंगणा जि.नागपूर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण जगदाळे करीत आहेत.