Home Cities अमळनेर अमळनेर येथील योगेश्वर कॉलेज जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत विजेता

अमळनेर येथील योगेश्वर कॉलेज जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत विजेता

0
160


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील १९ वर्षाआतील मुला मुलींच्या चाळीसगाव येथे आयोजित शासकीय शालेय जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत अमळनेर येथील योगेश्वर कॉलेजचा मुलांचा संघ विजेता ठरला आहे. अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीच्या लढाईत के आर कोतकर कॉलेजचा संघाला पराभूत करून योगेश्वर कॉलेजने ही कामगिरी बजावली.

यात विजेत्या संघातील खेळाडू चैतन्य वाघ (कर्णधार) ,अंकित कांबळे (उपकर्णधार), चंद्रप्रकाश अहिरे,अक्षर पाटील हे विद्यार्थी आहेत, या विजयामुळे योगेश्वर कॉलेजचा संघ आगामी नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.या यशस्वी संघाचे के आर कोतकर कॉलेजचे चेअरमन दादासाहेब पाटील, योगेश्वर संस्थेचे उपाध्यक्ष व प्राचार्य बापुसाहेब के डि पाटील, क्रीडा शिक्षक प्रा. पी एस तुरणकर, प्रा. शैलेश पाटील,  स्वप्नील पाटील, क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ आणि क्रीडा अधिकारी जगदिश चौधरी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.न्न मर्यादेच्या कक्षेत आणण्यात आले आहे.


Protected Content

Play sound