चोपडा प्रतिनिधी । येथील बारीवाड्यातील रहिवासी योगेश गिरीराज बारी (३०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
योगेश गिरीराज बारी यांचे दि. ६ मे रोजी सायंकाळी ७ वा निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि. ७ मे रोजी सकाळी १० वा राहत्या घरुन निघेल. ते राज्य परिवहन विभागात चालक म्हणून सेवेत होते. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, भाऊ, वहिनी, बहिणी असा परिवार आहे.