कासमवाडी येथे जुगार अड्ड्यावर धाड; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

download

जळगाव प्रतिनिधी । कासमवाडी येथे जुगार खेळणाऱ्या छापा टाकत नऊ जणांवर कारवाई करत जुगाराच्या सामानासह 1 लाख 26 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 9 जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. जुगार खेळणाऱ्या 9 जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीसांच्या हद्दीत असलेले कासमवाडी येथील लोहारांच्या घराजवळ काही जण जुगार खेळत असल्याची माहितीवरून एमआयडीसी पोलीसानी आज सोमवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात
शिवाजी निळकंठ सोनार वय 45, रा.जानकी नगर, नंदू किराणा मागे नेरी नाका, जळगाव, प्रविण रघुनाथ सोनवणे वय 40 रा. जानकी नगर वालवाडी जवळ नेरीनाका जवळ, जळगाव, प्रकाश तुकाराम सोनवणे वय 42 रा. दिनकर नगर मोहन टाकी, जळगाव, कल्पेश भास्कर वाणी वय 22, रा. लेंडीनाला जवळ, मारूती मंदी शनीपेठ, जळगाव, बाळू रूपचंद धनगर वय -55 रा. लक्ष्मी बेकरी शेजारी कासमवाडी, मधुकर बाबुराव सुर्यवंशी वय 53 रा. सदगरूनगर आयोध्यानगर राममंदीरजवळ, जळगाव, विनोद प्रताप पाटील वय -29 रा. कासमवाडी, जळगाव, मनोज अशोक साळुंखे वय-27 रा. संघर्ष चौक, कासमवाडी जळगाव, योगेश शामराव पवार वय-39, रा. तुकाराम जानकी नगर यांच्यावर कारवाई करण्यात आली.

मुद्देमाल जप्त
पाच मोबाईल, चार वाहने, रोख रक्कम असे एकून 1 लाख 26 हजार 100 रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनी विकास धनवट, पोकॉ सिध्देश्वर लटपटे, पोकॉ नामदेव पाटील, पोना महेंद्र गायकवाड, पोना नितीन पाटील यांनी केली.

Add Comment

Protected Content