प. वी. पाटील विद्यालयात योग प्रशिक्षण शिबिर

जळगाव प्रतिनिधी । गेल्या दीड-दोन वर्षांपासून आपण सर्वच जण ज्या विषाणूपासून भीत आहोत तो आता आपण काही प्रमाणात आपल्यापासून लांब पळवला आहे. आता शाळा व्यवस्थित सुरू झाल्या आहेत. या शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी या सर्वांच आरोग्य चांगलं राहावं व मनोबल वाढावं यासाठी केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयात योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

त्यात योग शिक्षक सुनिल गुरव यांनी अनुलोम-विलोम, भ्रामरी, प्राणायाम, डोळ्यांच्या सूक्ष्म हालचाली, विविध हास्य प्रकार, टाळ्यांचे प्रकार, हातपाय कमरेचे काही व्यायाम प्रकार या विविध प्रकारातून इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवत मुलांकडूनही करून घेतले. यानिमित्ताने योग प्रशिक्षणाचे एक छोटे शिबिर आज या ठिकाणी भरवण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कल्पना तायडे यांनी केले मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

 

Protected Content