मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पहिल्यांदाच जाहीर राजकीय सभेबाबत राजकीय वर्तुळातच नव्हेतर सर्वसामान्यां देखील मोठी उत्सुकता होती. पण ‘छे! अरे, हा तर आणखी एक टोमणे बॉम्ब निघाला’, असे खोचक ट्वीट करत टोला विधानसभा विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर लगावला आहे.
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील बीकेसीमध्ये जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी मनसेचे राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, भाजपा, हिंदुत्व आरएसएस अशा अनेक मुद्द्यांवर परखड टीका करीत तर कधी टोमण्यावर टोमणे मारीत आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गेल्या काही दिवसांपूर्वी केलेल्या टीकेचा देखील उद्धव ठाकरेंनी समाचार घेत त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिले.
यावर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटमध्ये ‘सर्वत्र पळापळ ..गदारोळ.. भयभीत नागरिक.. लोक घामाघूम…आणि त्याच्यापेक्षा विरोधक दहशतीत… तसेच सर्वत्र सन्नाटा असल्याचे चित्र आणि उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टोमणे बॉम्ब म्हणत याचे उत्तर जरूर आणि ठोकपणाने मिळेल, असा टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंची सभेनंतर आता शिवसेना, भाजपा-मनसे यांच्यात जोरदारपणे सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.