यावल प्रतिनिधी । येथील तहसीलदार महेश पवार १८ मार्च ते १ एप्रिल २१ पावेतो वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांचा रिक्त असलेल्या पदावर अतिरिक्त कार्यभार नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे पत्र पाठवुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यातर्फे पंकज लोखंडे यांनी कळविले आहे.
रविंद्र पाटील यांनी तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळावा जेणेकरून तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांचा कडे तात्पुरते तहसीलदार पदाची सुत्रे रवीन्द्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महसूल जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार पंकज लोखंडे यांनी काढलेल्या आदेशात कळविल्याने रवींद्र पाटील हे तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळतील. नायब तहसीलदार रवीन्द्र पाटील यांच्याकडे महसुल प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने त्याचा महसुलच्या प्रशासकीय कामास उत्तम प्रकारे फायदा होईल.