यावल प्रतिनिधी । यावल युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या कृतीच्या निषेधार्थ ‘जय भवानी, जय शिवराय’ हे यावल तालुक्याच्या वतीने ११ हजार पत्र पाठविणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अॅड.देवकांत पाटील यांनी सांगितले आहे.
नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य खा.उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेतील निवडच्या शपथविधी सोहळयाप्रसंगी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. त्यावर, हे राज्यसभेचे सभागृह नव्हे माझे दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही,” अशी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी समज दिली.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाजपाच्याच खासदाराला ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा देण्यापासून रोखलं. यावरुन भाजपाच्या मनात छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दल काय भावना आहेत हे दिसून आले. तसेच महाराष्ट्राबद्दल भाजपा नेत्यांच्या मनात किती द्वेष आहे आहे हे दिसते. ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा देण्यापासून खुद्द छत्रपतींचे वंशज आणि श्रीमंत उदयनराजे भोसले महाराजांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला याचा मी एक शिवप्रेमी म्हणून जाहीर निषेध करतो.
छत्रपती आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या दिल्लीने लक्षात ठेवावे की, आमच्या रगारगात शिवछत्रपतींचे रक्त आहे आणि पुन्हा एकदा आम्ही दिल्ली महाराष्ट्रा समोर झुकवू. या सर्व घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ११ हजार पत्र पाठवून निषेध केला जाणार आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील यांनी दिली आहे. यावेळी यावल शहरातील पोस्ट ऑफिस मध्ये जावुन व्यंकया नायडूच्या कृतीच्या निषेधार्ह पत्रे पाठवण्यात आले.
यावेळी यावल युवकाध्यक्ष देवकांत पाटील, राष्ट्रवादी जिल्ह्य सरचिटणीस प्रशांत पाटील गिरडगाव, जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाटील, तालुका सरचिटणीस किशोर गोलू माळी, हितेश गजरे, अमोल दुसाने, आशुतोष पाटील, राकेश सोनार, शरीफ तडवी, नरेंद्र सोनवणे, महेंद्र तायडे, ओम पाटील, निलेश बेलदार, भूषण पाटील, पावन राजपूत, अनिल पाटील आदीची उपस्थिती होती .
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/278161013447241/