यावल येथे पुरग्रस्तांसाठी सर्वपक्षीय मदत रॅली

yawal news 2

यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात आज१ ५ ऑगस्ट रोजी कोकण क्षेत्रातील कोल्हापुर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी यावल शहरातुन सर्वपक्षीय मदत रॅली काढण्यात आली.

यावल येथे तहसील कार्यालयात १५ ऑगस्ट चे ध्वजारोहण झाल्यानंतर लागलीच पुरग्रस्तांच्या मदतसाठी सर्वपक्षीय मदत रॅली काढण्यात आली. या रॅलीत शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, भाजपा हेमराज( बाळु) फेगडे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, शिवसेनेचे मुन्ना सांडूसिंग पाटील, नगरसेवक शेख असलम शेख नबी, माजी नगरसेवक हाजी ईकबाल खान, माजी नगरसेवक उमेश फेगडे, पुंडलीक बारी, आदीवासी कार्यकर्ते एम.बी. तडवी, मुबारक तडवी, काँग्रेसचे जिल्हा उपाधध्यक्ष हाजी शब्बीर खान, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, मनसेचे चेतन अढळकर, सेनेचे जगदीश कवडीवाले, भाजपाचे किशोर कुलकर्णी व्यंकटेश बारी, वसंतराव भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, अनिल जंजाळे यांच्यासह आदी सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकारी यांनी या मदत रॅलीत सहभाग घेतला.

या भागातून काढली रॅली
मदत रॅली ही यावल बसस्थानकापासून भुसावळ टी पॉईंट, बुरुज चौक, नगीना चौक, बारी वाडा चौक, काझीपुरा मस्जीद चौक, जुने भाजी बाजार, बोरावल गेट परिसर अशी रॅली काढण्यात आली. उद्या १६ ऑगस्ट शुक्रवार हा बाजाराचा दिवस असल्याने उद्या देखील रॅली काढण्यात येणार असुन, जमा करण्यात आलेली पुरग्रस्त मदत तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

Protected Content