भारतात ७३ लोक कोराना व्हायरसने संक्रमित; राज्यात ११ रूग्ण

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशामध्ये कोरोना व्हायरसचा कहर वाढत चालला आहे. सध्या भारतामध्ये १७ परदेशी नागरिकांसह एकूण ७३ लोक कोराना व्हायरसने संक्रमित झाले आहेत. चीनमधून जगभर पसरत असलेल्या या रोगामुळे जागतिक आरोग्य संघटनेने यास जागतिक संकट घोषित केले.

देशातील १२ राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या केरळमध्ये आढळली आहे. येथे १७ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाचे ११ रुग्ण आढळले आहेत. यासह उत्तर प्रदेशमध्ये १० आणि दिल्लीमध्ये ६ केसेस समोर आल्या आहेत. मंगळवारी ज्या सहा लोकांना कोरोना झाल्याचे आढळले होते त्यामधील तीन लोकांनी दुबईमार्गे अमेरिकेचा प्रवास केला होता. यातील चार लोक हे बंगळुरचे, तर दोनजण पुणे येथील आहेत. भारतामध्ये या लोकांच्या संपर्कात आलेल्या १४०० हून अधिक लोकांना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

तिकडे भूटानमध्ये एका अमेरिकी नागरिकास कोरानाचा संक्रमण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या ४०४ भारतीयांना असाममध्ये वेगवेगळे ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. बुधवारी (दि.११) इटलीहून आलेल्या ८३ लोकांना मानेसर येथील लष्कराच्या वतीने उभारण्यात आलेल्या आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवण्यात आले आहे.

Protected Content