यावल प्रतिनिधी | तालुक्यातील मारूळ येथे महागाईच्या विरोधात कॉंग्रेस पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील मारूळ येथे नरेन्द्र मोदीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल , घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढविलेल्या भरमसाठ महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे युवा नेता खासदार राहुल गांधी तसेच महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये व रावेर यावल मतदार संघाचे आमदार शिरिष मधुकरराव चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील परिषदचे गटनेता तथा कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे,युवा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक हितेश पाटील, सोहेल पटेल, कॉंग्रेस अल्पसंख्यक विभागाचे जिला अध्यक्ष मुनव्वर खान, कणखर नेता जावेद अली सय्यद, यावल पंचायत समिती गटनेता शेखर सोपान पाटील ,पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी ,अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष मसरूर अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
अल्पसंख्यांक यावल तालुका अध्यक्ष इखलास सय्यद, युवा यावल तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य मुदस्सर उर्फ सुल्तान सय्यद मारूळ ग्रामपंचायतीचे सरपंच असद अली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण , कामगार विरोधी कायदा ,बेरोजगारी इंधन भाववाढ , घरगुती गॅस दरवाढी तसेच जिवनावश्यक वस्तुच्या दरवादीच्या विरोधात निषेध करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नदीम सय्यद मतीउर रहमान मुदस्सर अली, मोहब्बत अली सय्यद, बाळू तायडे , प्रवीण हटकर ,कॉंग्रेस कार्यकर्ते हसरत अली सय्यद ताबिश सय्यद , यावल येथील नईम शेख , रहेमान खाटीक तसेच मारूळ येथील सारंग तायडे आकाश तायडे नितीन तायडे, युवराज इंग्दे ,संजय तायडे, राकेश तायडे माजी ग्रामपंचायत सदस्य सौ शकुंतला तायडे नलिनी तायडे ,मीरा तायडे, बेबाबाई तायडे, इत्यादी महिला व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.