यावल प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेल तालुकाध्यक्षपदी तालुक्यातील दहिगाव येथील प्रमोद चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
येथील भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यकारणी महत्वपुर्ण बैठक शनिवारी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडली असुन यावेळी दहिगाव येथील पक्षाचे निष्ठावंत व एकनिष्ठ कार्यकर्ते तालुक्याची प्रमोद धनसिंग चौधरी यांची ओबीस सेलच्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी आरोग्य शिक्षण व क्रीडा सभापती रविंद्र पाटील यांच्या हस्ते प्रमोद चौधरी यांना निवडचे पत्र देण्यात आले.
या बैठकीत तालुक्यातील शेतकर्यांना मिळणार्या पिक विम्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, भाजपा यावल तालुका सरचिटणीस विलास चौधरी व उज्जैनसिंग राजपूत,जिल्हा परिषद सदस्या सौ . सविता अतुल भालेराव, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालीका सौ कांचन फालक, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी, विद्या पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस राकेश वसंत फेगडे आणी भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी आदी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी,युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी भाजपा ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्षपदी प्रमोद चौधरी यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले.