यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील पंचायत समितीला मोठ्या प्रतिक्षेनंतर मिळालेले गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील यांची बदली झाल्याने तालुक्यात कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नाही. यामुळे विविध विकास कामांमध्ये समस्या निर्माण होत असल्याने प्रशासना बाबत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, तालुक्यातील गावपातळीवर काम करणाऱ्या सरपंच व ईतर लोकप्रतिनिधींना काम करणे अवघड झाल्याने जिल्हा परिषद प्रशासना बाबत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावल येथील पंचायत समितीला मोठया प्रतिक्षेनंतर मिळालेले गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांची कळवण ( नाशिक ) येथे साधारण सहा ते सात महीन्यापुर्वी बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा प्रभारी गटविकास अधिकारी यांनी पदभार स्विकारल्याने तालुक्यात लाखो रुपये खर्चाच्या निधीतुन प्रगतीपथावर असलेली विविध विकास कामांची गती व गुणवत्तेचे बारा वाजले असुन त्याचबरोषर निकृष्ठ कामे करणारी ठेकेदार मंडळीची आपली बिले काढण्यासाठी यावल पंचायत समितीच्या आवारात मागील दोन महीन्यापासुन एकच गर्दी दिसुन येत आहे.
यावल तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पातळीवर होणाऱ्या विविध विकास कामांची गुणवत्ता ही टक्केवारीच्या मोहापोटी हरवल्याची दिसुन येत आहे. सामाजीक कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातुन शासनाच्या निधीतुन होणाऱ्या विकास कामांच्या निकृष्ठतेबाबत अनेकांच्या तक्रारी आहे मग संबधीत अधिकारी हे या गुणवत्ता नसलेल्या विकास कामांची चौकशी करून कार्यवाही का करीत नाही असा मोठा प्रश्न लोकप्रतिनिधी पासुन विविध सामाजीक संघटनेकडून उपस्थित करण्यात येत असुन त्या जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने अधिकाऱ्यांवरची असलेली लोकप्रतिनिधींची पकड संपलेली आहे.
यावल पंचायत समितीला कायमस्वरूपी सक्षम गटविकास अधिकारी मिळत नाही तो पर्यंत तथा कथित ठेकेदार आणी आर्थिक मोहाला बळी पडणारे अधिकारी यांचा सावळा गोंधळ थांबणार नाही असे तालुक्यातील ग्रामीण पातळीवरील नागरीकांमध्ये बोलले जात आहे .