यावल yawal प्रतिनिधी । भाजपच्या नुकत्याच जाहीर झालेल्या कार्यकारिणीत हर्षल पाटील यांची सरचिटणीसपदी तर सौ. सविता भालेराव यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार राजुमामा भोळे mla rajumama bhole यांच्यासह माजी मंत्री आमदार गिरीश महाजन girish mahajan यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या भारतीय जनता पक्ष ग्रामीणची बैठक पार पडली. यात पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. jalgaon bjp
या बैठकीत यावल तालुक्यातील सातोद कोळवद येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व हर्षल गोवींदा पाटील यांची पक्षाच्या जळगाव जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे तर चिटणीसपदी जिल्हा परिसदच्या सदस्या सौ. सविता अतुल भालेराव यांची पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांनी निवड केली आहे.
त्यांच्या निवडीचे यावल तालुक्यातील पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा जावळे, कृषी भुषण तथा बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, युवा नेते अमोल हरिभाऊ जावळे, कृउबाचे संचालक हिरालाल चौधरी, यावलचे नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, विलास चौधरी, माजी तालुका अध्यक्ष डॉ. नरेन्द्र कोल्हे , जिल्हा बँक संचालक गणेश गिरधर नेहते, भाजपाचे यावल शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, अतुल भालेराव, अजय भालेराव, किशोर कुलकर्णी, गोपाळसिंग पाटील, माजी शहराध्यक्ष बाळु फेगडे आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.