यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून वाद घातल्या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक ११२ वर चिंचोली येथील कैलास अशोक कोळी यांचा दूरध्वनी आला. यामुळे ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल जगन्नाथ अशोक पाटील यांच्यासह नरेन्द्र बागुल, राहील गणेश, शामकांत धनगर अशांनी कैलास कोळी यास याबाबत विचारणा केली. यावरून कैलास कोळी याने अपशब्दांचा वापर करत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
दरम्यान, कैलास कोळी यास यावल पोलीस ठाण्यात शासकीय वाहनातून आणत असताना, वाहनातील बिनतारी यंत्रणेस लाथा मारून तोडफोड करून त्याने नुकसान केले. तसेच पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांनी त्यास फोन बाबत विचारणा केली असता त्यांना ही कैलास कोळी याने शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेला. तसेच सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान व फीर्यादी पो. कॉ. जगन्नाथ पाटील यांचे हाताला हाताला चावा घेतला या कारणावरून कैलास कोळी याचे विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे यासह विविध कलम अन्वये यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.