खंडीत वीज पुरवठा व वाढीव बिलांवर तोडगा काढा, अन्यथा आंदोलन- डॉ. कुंदन फेगडे

यावल प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात होणारा खंडीत वीज पुरवठा आणि वाढीव बिलांवर तोडगा काढा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, गेल्या १५ दिवसांपासून यावल शहरात व परिसरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा दिवसा आणि रात्री शेकडो वेळेत अघोषीत खंडित होत असतो आणि व्होलटेज चढ उतार होत असले तरी याबाबतीत महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे यावल शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. यावरून आता नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, नागरिकांना अवाच्या सव्वा विज बिले मिळालेली आहेत ज्यांच्या नागरीकाच्या घरात एक ट्यूब आणि एक पंखा आहे त्यांना सुद्धा दोन – दोन हजार रुपये लाईट बिले आली आहेत. मागील ६ते ७ महीन्यांच्या कालावधीत कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने हातावर पोट भरणारी कुटुंब यांना रोजगार नाहीत लोकांचा खाण्यापिण्याचे वांधे झाले असुन अनेकांवर उपासमारीचा कटू प्रसंग देखील ओढवले जात आहेत. यातच महावितरणतर्फे खंडीत वीज पुरवठा होत आहे. यातच लाईट बिलांचा मारा होत असल्यायामुळे जनता चांगलीच त्रस्त झाली असून लवकरच उपाय योजना कराव्यात नाही तरआपल्याला लोकांचा रोषाला सामोरे जावे लागेल याची आपण तयारी ठेवावी.

यात पुढे म्हटले आहे की, एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या कार्यक्षमतेवर जर प्रश्‍न उपस्थित होत असतील तर आम्हाला सुद्धा लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार याची आपण वेळीच गंभीर दखल घेऊन जनतेला उत्तर द्यावे असा ईशारा एका लेखी निवेदनाद्वारे नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग यावल यांना दिला आहे.

Protected Content