यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथील अविवाहीत तरूणाचा करूण अंत झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील किनगाव येथील अविवाहीत तरूणाची ठाणे मुंबई येथे राहात असलेल्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेवुन आपली जीवनयात्रा संपविली. याबाबत मिळालेली माहीती अशी किनगाव येथील राहणारा गणेश अनिल निंबायत वय २३ वर्ष हा मागील एक वर्षापासुन ठाणे मुंबई येथे कंपनीत नोकरीस होता. तो आपल्या मामाकडेे वर्तकनगर ( ठाणे ) येथे राहात होता. काल दिनांक ४ ऑक्टोबर २०२२च्या मध्यरात्रीस१२ वाजेच्या सुमारास त्यांने राहात असलेल्या खोलीत गळफास घेत आपली जिवनयात्रा संपविली.
किनगाव येथील राहणारे अनिल निंबायत यांचा मुलगा गणेश हा दोन बहीणींचा एकुलता एक भाऊ होता. या घटनेची माहीती मिळताच परिसरावर शोकळा पसरली आहे. रात्री उशीरा पर्यंत त्या तरूणावर किनगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आत्महत्या करण्यापुर्वी गणेश यांने लिहुन ठेवलेल्या सुसाईट नोट मध्ये म्हटले आहे की आपण जिवनात एक चांगले व्यक्ती , एक चांगला मुलगा , एक चांगला भाऊ होण्यासाठी खुप प्रयत्न केलीत पण आपण यशस्वी होवु शकलो नाही मला क्षमा करा असे लिहुन त्याने स्वत:ला संपविले.