Home क्राईम विवाहाचे आमीष दाखवून तरूणीवर अत्याचार

विवाहाचे आमीष दाखवून तरूणीवर अत्याचार

0
27

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल येथील २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वर्षभर शारीरिक संबंध ठेवत शारिरीक अत्याचार करून गर्भपात केल्या प्रकरणी एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अट्रावल येथील श्रावण कैलास कोळी याने एका तरूणीशी सूत जमवत तिच्याशी विवाहाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत १ सप्टेंबर २०१९ पासून ते ५ डिसेंबर २०२० दरम्यान संशयिताच्या गावातील राहत्या घरी व इतर ठिकाणी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गरोदर झाल्याने तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपातासाठी भाग पाडले. वर्ष उलटूनही संबंधिताने लग्न केले नाही. पीडितेने लग्नासाठी आग्रह धरल्यावर श्रावण कोळीने लग्नाला नकार दिला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात कोळीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound