यावल प्रतिनिधी । शरद पवार यांच्यावर ईडीतर्फे केलेली कारवाई ही आकस बुध्दीने करण्यात आल्याचा आरोप करून येथे राष्ट्रवादीतर्फे सरकारचा निषेध करण्यात आला.
या संदर्भात प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथीत गैरव्यवहारामध्ये शरदचंद्र पवार यांचा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही सहभाग नाही. मात्र सदरील गैरव्यवहारात आरोप असलेल्या व्यक्ती हया त्यांच्या विचारांच्या असल्याच्या तुटपुंज्या कारणा वरुन व कोणतेही सबळ कारण व पुरावे नसतांना पवार यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मागील पाच वर्ष कोणतीही कारवाई न करता ऐन विधान सभा निवडणुकीच्या काळात खोटा गुन्हा नोंदवुन त्यांना हेतूपुर्वक लक्ष्य केले जात आहे. या सर्व प्रकरणी ईडी व इतर यंत्रणांचा सोई प्रमाणे वापर करुन दडपशाहीचा मार्ग अवलंबण्याचा प्रकार सुरु आहे. त्यातुनच असे खोटे गन्हे नोंदविण्यात येत आहेत. याचा यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र विरोध करुन निषेध नोंदवित असल्याचे यात म्हटले आहे.
संबंधीत निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात अव्वल कारकुन महेश साळुंखे यांना देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मुकेश येवले, बाजार समिति माजी उपसभापती दिनकर पाटील, विजय पाटील , जिल्हा संघटक सईद शेख, राष्ट्रवादी कॉग्रेसचे फैजपुर शहराध्यक्ष अनवर खाटीक, यावल शहराध्यक्ष करीम मन्यार , आदिवासी जिल्हाध्यक्ष एम. बी. तडवी, युवक तालुका अध्यक्ष देवकांत पाटील, फैजपुर उपनगरध्यक्ष रशिद तडवी, बोदळे नाना अल्पस्खांक उपाध्यक्ष शेख, शाकीर, कौसर अली सैय्यद ,बारसु नेहते, निळकंट फिरके , किसान सेल तालुका अध्यक्ष वसंत पाटील मनोहर झाबंरे सुरेखा पारधे, माजी सरपंच विकास पाटील, गणी शेख,बाळ जासुद, सद्दाम मन्यार, मतिन मलिक,अशोक भालेराव, संजय वाघुळदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.