सर्वसामान्यांच्या हितासाठी कटीबध्द- शिरीष चौधरी

shirish chaudhari faizpur

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । आपण सर्वसामान्यांच्या हितासाठी कटीबध्द असून यामुळे विकास साधण्यासाठी जनतेचा कौल मिळणार असल्याचा आशावाद माजी आमदार शिरीष चौधरी यांनी येथील मेळाव्यात व्यक्त केला.

येथील सुमंगल लॉन्स येथे यावल तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या प्रारंभी लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी व सहकारमहर्षी जे. टी. महाजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, या भागाला लोकसेवक मधुकरराव चौधरी व जे. टी. महाजन यांनी सुजलाम- सुफलाम केले. मी बाळासाहेबांची कामे व विचारांवर चालणार आहे.मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या थकहमीसाठी कारखान्याच्या संचालकांसोबत मीही सातत्त्याने प्रयत्न केले, कारखान्याच्या हितासाठी सरकारवर टीका केली नाही. ज्या संचालकांनी भाजपात प्रवेश केला त्यांनां मी शुभेच्छा देतो. तसेच या दोन्ही नेत्यांनी उभारलेल्या प्रकल्पाच्या व शेकरी , कामगार तसेच प्रकल्पावर अवलंबून असलेल्या घटकांच्या हितासाठी कायम पयत्नशील राहिल असे त्यांनी आश्‍वाशन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष मुकेश येवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ईडीच्या चौकशीत गोवण्यात आल्याचा निषेध केला. तर मसाकाचे चेअरमन शरद महाजन यांना धमकावून भाजपा मध्ये प्रवेश करायला भाग पाडले असा आरोप केला. यानंतर ज्ञानेश्‍वर बढे यांनी मार्गदर्शन करतांना या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस सरकारने केलेल्या कामांची आठवण करून दिली तर युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील म्हणाले की नेत्यांना ईडीच्या चौकशीत उभं करून त्यांचं तोंड बंद करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान यावेळी सय्यद जावेद, नितीन व्यंकट चौधरी, रमेश नागराज पाटील,माजी आमदार रमेश चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर केले सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हितेश पाटील,मसाका संचालक नितीन व्यंकट चौधरी, अनिल महाजन, शेखर पाटील, भगतसिंग पाटील, विजय प्रेमचंद पाटील, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच संस्थापक अध्यक्ष एम बी तडवी सर,निळकंठ फिरके,गिरीधर पाटील, मसाका संचालक अनिल महाजन, बारसु नेहेते, दिलरुबाब तडवी, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, अब्दुल सईद, हाजी याकूब शेख, हाजी युसूफ शेठ, सुरेखा पारधे,करिम मण्यार,मनु झांबरे, गणी खान, काँग्रेस गटनेता कलीम खां मण्यार,माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, माजी नगरसेवक शेख जफर,नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, प्रभाकर सपकाळे सातपुडा अर्बनचे व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी, अमोल भिरुड, हंबर्डी चे माजी सरपंच बलदार तडवी,मारुळचे माजी सरपंच सैय्यद अकील, जावेद जनाब,शाम मेघे सांगवी, यावल नगरसेवक रसूल शेख,समीर मोमीन,शेख जाकीर, शेख असलम, सीताराम पाटील ,किशोर फालक, प्रवीण घोडके, अनिल जंजाळे, भूषण भोळे, शेख रईस मोमीन शाबाज खान,अशोक भालेराव,चंद्रकला इंगळे, व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी न्हावी, पिळोदा ,आमोदा, सांगवी बु , काळा डोह या गावातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला दरम्यान प्रास्ताविक जि. प. सदस्य तथा काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी प्रास्तविक केले सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी केले तर मेळावा यशस्वीतेसाठी फैजपूर शहर काँग्रेस अध्यक्ष शेख रियाज,यावल काँग्रेस शहर अध्यक्ष कदिर खान, फैजपूर शहर युवक काँग्रेस शहर अध्यक्ष शेख वसीम जनाब काँग्रेस अनु जाती यावल तालुका अध्यक्ष शेखर तायडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तायडे ,रामाराव मोरे, बबन तायडे आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content