यावल प्रतिनिधी । यावल नगरपरिषदचे तत्कालीन मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांची पाचोरा येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या मुख्याधिकारीपदाच्या जागेवर रावेर नगरपरिषदचे मुख्यधिकारी रविंद्र लांडे हे मागील एक वर्षापासुन यावल नगरपरिषदच्या प्रभारी मुख्यधिकारीपदाची सुत्रे सांभाळुन होते.
या ठिकाणी मनमाडहुन दिलीप मेणकर यांची यावल येथे बदली झाली असुन, कायमस्वरूपी मुख्यधिकारी मिळाल्याने नगर परिषदच्या हद्दीतपुनश्च वाढलेले अतिक्रम, विस्तारीत वस्त्यांचे प्रलंबीत असलेली विकासकामे, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असे त्यांचा कार्यकाळात मार्गी लागतील अशी अपेक्षा यावलकरांच्या वतीने व्यक्त करण्यात येत असुन, येत्या सोमवारी ते यावल नगर परिषदच्या मुख्याधिकारीपदाची सुत्रे सांभाळणार आहे.