Home धर्म-समाज लेवा शुभमंगल तर्फे वधू-वर परिचय मेळावा उत्साहात: १० देशांमधून सहभाग

लेवा शुभमंगल तर्फे वधू-वर परिचय मेळावा उत्साहात: १० देशांमधून सहभाग

0
45
Leva Shubhmangal App

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लेवा शुभमंगलतर्फे समाजातील विवाहेच्छूंचा परिचय मेळावा उत्साहात पार पडला असून यात दहा देशांमधील तरूण-तरूणी आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते.

लेवा शुभमंगल ऍपच्या माध्यमातून समाजातील वधु/वर आणि पालक यांच्या विवाहाच्या समस्या लवकर दूर व्हाव्या आणि विवाह लवकर जुळून यावा यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली असून याला समाजबांधवांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, लेवा शुभमंगलच्या माध्यमातून परदेशात नोकरी करणार्‍या किंवा परदेशातील स्थळं शोधणार्‍या बांधवांसाठी भालोद येथून एका स्पेशल ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जगभरातून सुमारे १० विविध देशातून वधु वर आणि त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदविला.
प्रथम दिवशी मेळाव्यामध्ये डॉ. प्रमोद हरी महाजन (नाशिक) यांचे अमूल्य मार्गदर्शन झाल्यावर सर्व वधु-वर यांनी स्वतः चा परिचय दिला. त्यानंतर _दुसर्‍या दिवशी लेवा शुभमंगल तर्फे नवीन प्रयोग म्हणून पालकांना ही समोरील स्थळांविषयी अजून स्पष्टता यावी म्हणून स्पेशल पालक परिचय मेळावा घेण्यात आला_. त्यामध्ये सुद्धा भरपूर पालकांनी स्वतः चा सविस्तर परिचय दिला आणि हा एक नवीन प्रयोग सर्वांना आवडला. यामुळे या मेळाव्यास अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद लाभल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

दरम्यान, ज्यांना ज्यांना हजारो स्थळांमधून उत्तम स्थळांचा शोध घ्यायचा त्यांनी लवकरात लवकर खालील लिंक वर क्लिक करून लेवा शुभमंगल मोबाईल ऍप डाऊनलोड करून आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी लेवा शुभमंगल कार्यालयाशी ९४२०३०९९६५; ९३७३४४३३१० आणि ९७३०५५०५०६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लेवा शुभमंगल ऍपच्या डाऊनलोड करण्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.flyctsofttech.matrimonialapp


Protected Content

Play sound