कोळवद येथील खळ्याला आग : सुमारे ११ लाखांचे नुकसान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोळवद शिवारातल्या खळ्याला लागलेल्या आगीत सुमारे ११ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील कोळवद येथील पराग रवींद्र चौधरी यांच्या नदी काठावरील खळयाला अचानक आग लागुन सुमारे ७ लाखाचे कापूस व चार लाखाचे शेती अवजारे जळुन खाक झाल्याची घटना घडली असुन , या अग्नीशमन दल व ग्रामस्थांच्या मदती मोठया परिश्रमानंतर ही आग विझविण्यात आली आहे.

कोळवद येथे काल रात्री ११ वाजेच्या सुमारास खडकी नदीच्या काठावर असलेल्या शेतकरी पराग रविन्द्र चौधरी यांच्या खळ्याला अचानक आग लागल्याने परिसरात धावपळ उडाली. या अचानक लागलेल्या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . आज घटनास्थळी मंडळ अधिकारी व तलाठी पंचनाम्यासाठी जात पोहोचत आहे. यात सुमारे अकरा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ठ झाले नाही . या ठिकाणी यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील व त्यांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष सहकार्य केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: