आदिवासी महिलेच्या मृत्यू प्रकरणी पतीसह दिराविरुद्ध गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अतिदुर्गम भागातील, गाडर्‍या, येथील विवाहितेने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणात तिचा पती व चुलत दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील धुपा तालुका झीरण्या जिल्हा खरगोन येथील, करसना नकलसिंग मेहता, या युवतीचा विवाह तालुक्यातील गाडर्‍या येथील सुभाष जामसींग बारेला याचे सोबत ऑक्टोबर २२ मध्ये झाला होता विवाहापासून सुभाष बारीला हा करसना हीला, तू मला आवडत नाही तसेच मला दुसरे लग्न करावयाचे आहे म्हणून तिला शारीरिक व मानसिक त्रास देत लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत असे. दरम्यान, ९ जानेवारी रोजी याच कारणावरून तिचा पती सुभाष यांनी विवाहितेस मारहाण करत तू मला आवडत नाही मला दुसरा विवाह करायचा आहे तेव्हा दिर अल्या गुमान बारेला यानेही विवाहितेस तू सुभाषला आवडत नाहीस त्याला दुसरं लग्न करावयाचे आहे असे सांगितले.

यामुळे संबंधीत विवाहिता घरून निघून गेली. नऊ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान विवाहितेने जंगलात साडीने गळफास घेत आत्महत्या केली अशा आशयाची फिर्याद विवाहितेचे वडील नकल सिंग गुटिया मेहता राहणार धुपा तालुका झीरण्या जिल्हा खरगोन, यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून पती सुभाष बारीला व दीर अल्या गुमान बारेला यांचे विरुद्ध आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचे कारणावरून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.

Protected Content